
Viral Video : शेतकऱ्याचं देशी जुगाड अन् शून्य मिनीटात नारळाच्या शेंड्यावर
आपल्या देशात टॅलेंटला कमी नाही. अनेक जुगाडू कार्यकर्ते आपल्याकडे आहेत पण ते वर यायला मार्ग व्यासपीठ मिळत नाही. अनेक जुगाड आपण आत्तापर्यंत पाहिले असतील. पण सध्या शेतकऱ्यांनी बनवलेल्या एका जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नारळाच्या झाडावर चढण्याचं यंत्र या व्हिडिओत दिसत आहे.
हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती यंत्राच्या साह्याने नारळाच्या झाडावर चढताना दिसत आहे. तर झाडावर चढणं या यंत्रामुळे खूप सोपं झालं आहे. एक व्यक्ती आरामात एका मिनीटाच्या आत नारळाच्या झाडाच्या शेंड्यावर चढून जात आहे. या यंत्रामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
हेही वाचा: Viral Video : शाहरूख दीपिकाच्या 'पठाण'मधील गाण्यावर आंटीचा डान्स
दरम्यान, शेतकरी महिला सविता डकले यांनी आपल्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर शेतीतील असे अनेक जुगाड व्हिडिओ ते आपल्या पेजवरून शेअर करत असतात. तर सविता या सोशल मीडियावर अनेक शेतीसंदर्भात माहिती देत असतात. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.