Father's Day 2023 : फादर्स डे ला वडिलांना पाठवा या हटके शुभेच्छा, वाचून गर्वाने फुलेल त्यांची छाती

फादर्स डे च्या निमित्ताने तुमच्या वडिलांना पाठवा हे खास संदेश
Father's Day 2023
Father's Day 2023 esakal

Father's Day 2023 : वडिलांचा डोक्यावर हाथ आणि त्यांची साथ आयुष्यात फार महत्वाची असते. आयुष्यात जेवढं आईचं महत्व आहे तेवढंच वडिलांचं देखील आहे. वरून कणखर आणि आतून हळवं मन असणारा व्यक्ती म्हणजे वडील. आज फादर्स डे. यामित्ताने वडिलांसाठी असणारं तुमचं निस्वार्थ प्रेम या शुभेच्छांच्या रूपाने तुमच्या वडिलांना पाठवा.

आई मुलांना जास्त जवळची असते कारण वडील जेव्हा कमावण्यासाठी घराबाहेर पडतात तेव्हा बाळाच्या जवळ असणारी आईच असते. वडिलांच्या मनात असणारं प्रेम ओठांवर कधीतरी येतं. मुलांचं उज्वल भविष्य, भविष्यातील गरजांसाठी पैशांचं नियोजन आणि आणखी कितीतरी जबाबदाऱ्या सांभाळत बाहेरून कठोर आणि आतून करूण हृदय असणारे वडील. त्यांना फक्त आजच नव्हे तर तुम्हाला जेव्हा आठवण येईल तेव्हा प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडू नये.

तुमच्या स्पेशल डॅडीसाठी स्पेशल संदेश

१) लांब पावलं त्यांची अन् भविष्याचा विचार करणारे लांबलचक विचार

बाळा जेवलास का रे, शाळेतली वह्या पुस्तकं नीट आहे ना जबाबदारीने विचारणार

शिक्षणासाठी त्यांनी केलीय माझ्या नावाची पॉलिसी, म्हणूनच त्यांच्या पायी चप्पल आजही फाटकी

बाबाचे महत्व सांगायला अक्षर नक्कीच अपूरे पडणार

बाबांएवढं प्रेम अन् त्यांनी घेतलेल्या कष्टाची आम्ही मुलं जबाबदारीने परतफेड करणार

Happy Father's Day

२) खांद्यावर ज्याच्या जबाबदारीचे ओझे

ते बाबा माझे सर्वात लाडके

कायम माझा विचार करतील आधी

नंतर नातं त्यांचं विश्वाशी

Happy Father's Day

३) बाबा म्हणजे मुलांचं जग

अन् मुलं म्हणजे बाबांचं विश्व

बाबाची किर्ती सांगायची कशी त्यास शब्द सापडले नाही

बाबा तुमच्या अपार प्रेमाची किंमत होऊच शकत नाही (Quotes)

Happy Father's Day

Father's Day 2023
Fathers Day 2023 : वयात येणाऱ्या मुलासोबत Bonding बनवणं तसं अवघडच? प्रत्येक बाबाच्या कामी येतील अशा टिप्स!

वरील व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला वडिलांच्या संघर्षाची जाणीव नक्कीच झाली असेल.

४) खंबीर व्यक्तीमत्व अन् ठाम मत मांडतात

काळजी लपून करतात अन् हक्काने रागवतात

मी झोपल्यानंतर त्यांना येते सुखाची झोप

एवढी काळजी माझे बाबा माझ्यासाठी करतात

Happy Father's Day

५) माझ्या आयुष्यातलं पहिलं धाडसी व्यक्तीमत्व माझे बाबा

जन्म झाल्यापासून मला फुलाप्रमाणं जपताय माझे बाबा

आजचा दिवस असू द्या फादर्स डे

कारण तुम्ही रोजच स्पेशल असाल माझ्यासाठी बाबा

Happy Father's Day

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com