Viral Video : रस्ता ओलांडताना पिल्लांनी दिला त्रास; मादी बिबट्याने केलं असं...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

आई ही आईच असते. ती आपल्या पिल्लांना वाढवण्यासाठी जीवाचं रान करत असते. तर संरक्षणासाठी ती कितीही मोठ्या संकटाला तोंड देत असते. पण पिल्लांची काळजी तिला कायम असते. अशाच एका मादी बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मादी बिबट्याला तिचे पिल्ले त्रास देताना दिसत आहेत.

Viral Video
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मादी आपल्या पिल्लांना घेऊन रस्ता ओलांडत आहे. तर मध्येच एक पिल्लू माघारी जात आहे. ते पाहून मादी परत येते आणि त्याच्याजवळ थांबते. तरीही हे पिल्लू पाठीमागे जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

त्यानंतर वैतागलेल्या आईने त्याच्या मानेला तोंडात धरून पुढे ठेवले आणि ती निघून गेली. त्यानंतर पिल्लू आईच्या पाठीमागे गेले. ती पिल्लाच्या काळजीपोटी त्याला तोंडात उचलून घेत आहे. हा व्हिडिओ पाहून आपणही भावनिक व्हाल.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "लहानपणी आपणही आईला असेच वैताग देतो" अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या असून मोठ्या प्रामाणावर हा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com