Viral Video : त्याने चेंडू अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी...; "या फिल्डरला ऑस्कर द्या"

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. सध्या अशाच एका क्रिकेट सामन्यातील व्हिडिओ व्हायरल होत असून या फिल्डरला पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Video
मुस्लीम डिलीव्हरी बॉयला हिंदुत्ववाद्यांकडून काठीने मारहाण? थरारक CCTV Footage Viral

व्हायरल व्हिडिओ स्थानिक क्रिकेट टूर्नामेंटमधील आहे. फलंदाजाने फटका मारल्यानंतर उपस्थित असलेल्या फिल्डरला चेंडू अडवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. फिल्डर जाड असल्याने त्याला वेगाने पळताही येत नाही. शेवटी सीमारेषेजवळ फिल्डर पोहचतो, चेंडू अडवतो पण तो खाली पडतो.

एवढी कसरत करूनही तो स्टंम्पकडे चेंडू फेक्याचा प्रयत्न करतो पण चेंडू त्याच्या पायाला लागून सीमारेषेबाहेर जातो. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. "या फिल्डरला ऑस्कर पुरस्कार द्यायला पाहिजे" असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com