Viral Video : कामापुढे झोपही हारली; डिलीव्हरी एजंटच्या व्हिडिओने जिंकली लाखोंची मनं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Delivery Viral Video

Viral Video : कामापुढे झोपही हारली; डिलीव्हरी एजंटच्या व्हिडिओने जिंकली लाखोंची मनं

Emotional Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा विविध विषयांवरील व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ लाखो लोकांची मनं क्षणार्धात मनं जिंकून घेतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Food Delivery Agent ) एजंटचा आहे. यामध्ये तो अधिक थकलेला दिसून येत आहे. असे असतानाही तो त्याचे काम करताना दिसून येत आहे.

हेही वाचा: Viral: ब्रेकअप झालेल्यांसाठी खास ऑफर, बेवफा चायवाला देतोय डिस्कांउटमध्ये चहा

हा डिलिव्हरी एजंट एका सिग्लनवर उभा आहे. या दरम्यान तो थकलेला दिसून येत आहे. थकल्यामुळे त्याला झोप येत असल्याने तो यात डुलकी घेताना दिसून येत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून लाखो यूजर्स भावूक झाले आहेत.

हेही वाचा: Anand Mahindra Viral Tweet : मुलीची कलाकारी बघून आनंद महिंद्रा म्हणाले, हा तर चमत्कारच!

मोठ्या प्रमाणात व्हायरल होणार हा व्हिडिओ जावेद अन्सारी नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्राम अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 2.4 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर, एक लाख 66 हजारांहून अधिक जणांनी लाईक केले आहे. याशिवाय अनेक यूजर्सने कमेंट केले आहे. एका यूजरने आपणही हे काम केल्याची कमेंट केल्याचे म्हटले आहे.