Wife Attacks Husband Over Obscene Reelsesakal
Trending News
Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर
Wife Attacks Husband Over Obscene Reels : अनीस आणि ईशरत अशी या दाम्पत्याची नावे आहेत. ईशरत अश्लील रील्स बनवत असून, याबाबत तिला टोकल्यास ती जिवे मारण्याची धमकी देते, असा आरोप पती अनीसने केला आहे.
'अश्लील रील्स बनवणे बंद कर' म्हणाल्याने संतापलेल्या पत्नीने पतीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील अशोक विहार परिसरात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपासही सुरु केला आहे.