Viral Video : 'माझ्या BF सोबत का फिरतेस?' तरूणीला लाथाबुक्क्यानी, झिंज्या उपटत मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : 'माझ्या BF सोबत का फिरतेस?' तरूणीला लाथाबुक्क्यानी, झिंज्या उपटत मारहाण

एका मुलीसाठी अनेक तरूणांचे भांडणे झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर एका तरूणीच्या प्रेमात पडल्यामुळे अनेक तरूणांना जीवही गमावावा लागला आहे. पण एका मुलासाठी मुलींचे भांडणे लागल्याचं आपण कदाचित पहिल्यांदा ऐकलं असेल. अशाच तरूणीच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना कुठे घडली आहे याची अधिकृत माहिती अजून समोर आली नाही.

(Girls Fighting for one boyfriend viral video)

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन तरूणी एका तरूणीली बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तर तिला अर्वाच्य भाषेत शिव्याही देत आहेत. या व्हिडिओमध्ये "माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस?" असा सवालही करत आहेत. तिघींनी मिळून एका मुलीला लाथाबुक्क्या आणि केसं उपटत मारहाण केली आहे. तर तिथेच असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.