Groom’s 10 Demands Before Marriage : लग्नाच्याआधी नवरदेवानं केल्या अशा काही मागण्या, की सासऱ्यांच्या डोळ्यात आलं पाणी!

Groom’s Unusual 10 Demands Before Marriage : पाहा नवरदेवाने केलेल्या या मागण्यांची यादी, जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे
A groom sharing his emotional 10 demands before marriage — leaving the bride’s father teary-eyed during the wedding ceremony.

A groom sharing his emotional 10 demands before marriage — leaving the bride’s father teary-eyed during the wedding ceremony.

Sakal

Updated on

Heart-touching wedding story, groom’s 10 emotional demands: आजकालच्या लग्नसमारंभाच्या पद्धतीन पूर्णपणे बदलेल्या आपण बघतो. आजकाल विधींपेक्षा फोटोसेशनला अधिक महत्त्व असतं, तर केवळ पत्रिकेत छापण्यापुरतं लग्नाचं मुहूर्त काढलं जातं अन् प्रत्यक्षात लग्न कितीतरी उशीरा लागत. याशिवाय, डीजेच्या दणदणाटात निघालेली नवऱ्या मुलाची वरात ही रस्यावरील लोकांच्या कानाचे अक्षरशा पडदे फाडते.

मात्र आजकालच्या अशा या मॉडर्न लग्नसमारंभाला फाटा देत एक नवरदेवानं अतिशय शांततेत, विधिवत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या संदर्भातील काही मागण्या त्याने आपल्या होणाऱ्या सासरेबुवांसमोर मांडल्या. नवऱ्या मुलाने केलेल्या या मागण्या पाहूण सासरेबुवांच्या डोळ्यात पाणीच आले. तर या मागण्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये व्हायरल झाल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

एका व्हायरल सोशल मीडिया पोस्टनुसार, कथित वराने लग्नाच्या अगदी आधी त्याच्या सासऱ्यांना १० मुद्द्यांची मागणी यादी दिली होती, जी आताच्या लग्नसमारंभाच्या  ट्रेंडला आव्हान देते आहे. अनेकांकडून या मागण्यांना सहमत असल्याच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

A groom sharing his emotional 10 demands before marriage — leaving the bride’s father teary-eyed during the wedding ceremony.
Fake Tiger and Real Tiger Viral Video : खतरनाक!!! वाघाचं कातडं पांघरून जंगलातील वाघाच्या तोंडासमोर गेला पठ्ठ्या अन् मग...

नवरदेवाच्या नेमक्या मागण्या काय? -

१.कोणतंही प्री-वेडिंग फोटोशूट होणार नाही २. नवरी मुलगी घागरा-ओढणीत नाही तर साडीमध्ये असेल ३. कर्णकर्कश म्यूझिक वाजणार नाही, अल्हाददायक इंस्ट्रुमेंटल म्यूझिक वाजेल ४. वरमाला घालतेवेळी स्टेजवर केवळ नवरा आणि नवरी असतील. ५. जयमाला घालताना कोणीही नवऱ्याला किंवा नवरी मुलीला उचलणार नाही.

A groom sharing his emotional 10 demands before marriage — leaving the bride’s father teary-eyed during the wedding ceremony.
Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

६. लग्न लावण्यासाठी आलेल्या भटजींना कोणीही त्रास देणार नाही. ७. लग्नाचे विधी होत असताना फोटोग्राफर लांबूनच फोटो काढेल, कोणताही व्यत्यय आणणार नाही. ८. नवरा-नवरी बळजबरी पोज देणार नाही

A groom sharing his emotional 10 demands before marriage — leaving the bride’s father teary-eyed during the wedding ceremony.
ICC Latest Ranking Top 10 Batsmen : 'आयसीसी' लेटेस्ट रँकिंगमधील 'टॉप-10' बॅट्समन; भारताचा दबदबा कायम!

९. लग्न दिवसा होईल आणि पाठवणी संध्याकाळी. जेणेकरून लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना रात्री उशीरापर्यंत थांबायला लागणार नाही आणि ते आरामात घरी पोहचतील. १०. कोणीही नवरा-नवरीला चुंबन घेण्यास सांगणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com