

Gurugram Home Guard Diwali Gift Video Goes Viral
esakal
Viral Video: दिवाळीच्या सणाच्या काळात गुरुग्राममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्यावर असलेल्या एका होमगार्डने वाहनचालकाकडे चक्क दिवाळीची भेट मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरुवातीला सणाच्या शुभेच्छा देणाऱ्या या कर्मचाऱ्याने काही वेळातच 'माझी दिवाळीची भेट कुठे आहे?' असा थेट सवाल केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारामुळे पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात असून, गुरुग्राम पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कारवाई सुरू केली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा