Viral Video : डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलेल्या रुग्णाचा मोबाईल अचानक फुटून आग लागली अन्... थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Phone Explosion : ग्वाल्हेरमधील थाटीपूर परिसरातील नेत्र चिकित्सालयात रविवार, १ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता रुग्णाच्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. तपासणीसाठी आलेला रुग्ण सोफ्यावर बसलेला असताना त्याच्या मांडीवरील फोनमधून धूर निघू लागला.
Gwalior Mobile Phone Blast: What Happened

Gwalior Mobile Phone Blast: What Happened

esakal

Updated on: 

Mobile Explosion Caught on CCTV : मोबाईल फोनचा वापर करताना अनेकदा त्याच्या बॅटरीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलेल्या एका रुग्णाच्या हातातील मोबाईल अचानक बॉम्बसारखा फुटला आणि त्याने पेट घेतला. या घटनेमुळे संपूर्ण क्लिनिकमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...