सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. अनेक जण रात्रीच्या अंधारात पाण्यात हळद मिसळून रील्स आणि व्हिडीओ तयार करत आहेत. मात्र हे केवळ ट्रेंड न राहता आता चिंता करणारी गोष्ट बनली आहे. प्रसिद्ध ज्योतिष अरुण कुमार व्यास यांनी या ट्रेंडबाबत एक गंभीर गोष्ट सांगितली आहे. अशा प्रकारच्या कृतीमुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते असं त्यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे.