Snake Viral Video : घराच्या सिलिंगवर अडकले तीन महाकाय अजगर; Video पाहून थरकाप उडेल | Giant Snake fall through ceiling in Malaysia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Giant Snake Viral Video

Snake Viral Video: घराच्या सिलिंगवर अडकले तीन महाकाय अजगर; Video पाहून थरकाप उडेल

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो.

सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. पण सध्या घरात निघलेल्या अजगराचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका घराच्या सिलिंगवर एक भलामोठा अजगर गेलेला दिसत आहे. काही व्यक्ती अजगराला खाली घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असून सिलिंग तोडल्यानंतर त्याच्यातून तीन अजगर लटकताना दिसत आहेत.

त्यांच्या वजनाने छताला लावलेले सिलिंग तुटून खाली पडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अजगरांचा आकार पाहून आपला थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

टॅग्स :pythonviral video