Viral Video : कामचुकार बायकोशी नवऱ्याचे भांडण; लाईव्ह घटस्फोट अन् शेवटी...

Video
VideoSakal

नवरा बायकोचे अनेकवेळा भांडणे होत असतात. कधीकधी या भांडणाचे रूपांतर मारहाणीत होते आणि हे प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. त्यानंतर या नात्यामध्ये तूट पडते. अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये या जोडप्याचे भांडण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते.

हेही वाचा - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली बायको कशी कामचुकार आहे, घर नीट आवरत नाही, घरात सगळा पसारा पडलेला आहे हे व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर बायको फोनमध्ये काहीतरी करताना त्याला दिसते. नवरा तिचे गऱ्हाणे सांगत असताना बायको त्याला म्हणते, "तुला माझा एवढाच त्रास असेल तर घटस्फोट घे." असं म्हटल्यावर नवरा स्तब्ध होतो.

Video
Viral Video : सॅल्यूट! एअर होस्टेसने प्रवाशाच्या हाताला लावला मलम अन्...

दरम्यान, व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला कळते की हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवेलला आहे. तर हा एक डिजीटल क्रिएटर असून त्याने हा व्हिडिओ बनवण्यासाठी ही शक्कल लढवली आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही सुरूवातीला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com