

IIT Bombay graduate Kanishak Kataria quit his nearly Rs 1 crore annual job in South Korea and secured All India Rank 1 in the UPSC Civil Services Examination 2018 in his first attempt
esakal
भारतातील प्रतिष्ठित आयआयटी मुंबईमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक तरुण परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, याच संस्थेतून शिक्षण घेतलेल्या कनिष्क कटारिया याने वेगळीच वाट निवडली. दक्षिण कोरियामध्ये वार्षिक जवळपास एक कोटी रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी मिळूनही त्याने ती सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देण्याचे ध्येय निश्चित करून त्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात देशात पहिला क्रमांक मिळवला.