Interesting Facts Of Birds: पक्षी झोपेत खाली पडतात का? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Birds

Interesting Facts Of Birds: पक्षी झोपेत खाली पडतात का? जाणून घ्या

Interesting Facts Of Birds : प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे. निरोगी आयुष्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक आहे. अनेकांना झोपल्यानंतर वारंवार कुस बदलण्याची सवय असते. यामुळे बेडवरून खाली पडण्याची शक्यता असते. पण झाडावर झोपणारे पक्षी कधी खाली पडत नाहीत, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? काय आहे यामागचे कारण, जाणून घेऊया

हेही वाचा: Solapur : नवीन पक्षी नसल्याने संवर्धन कागदावरच

पक्षी खूप कमी झोपतात

पक्षी माणसासारखे आठ ते नऊ तास झोप घेत नाहीत. ते खूप छोटी छोटी झोप घेतात. त्यांना गाढ झोप घेण्यासठी फक्त १० सेकंदाचा वेळ लागतो. यासह पक्षी एक डोळा उघडा ठेवून झोप घेऊ शकतात. पक्ष्यांचं आपल्या मेंदुवर नियंत्रण असतं.

हेही वाचा: नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात तापसचे वास्तव्य

झोपताना मेंदुचा एक भाग कायम ॲक्टिव्ह असतो. पक्ष्यांचा ज्या बाजूचा डोळा उघडा असतो त्याच्या विरुद्ध बाजूचा मेंदू सक्रीय असतो. यामुळे स्वत:ला शिकारीपासून वाचवण्यास सक्षम असतात.

हेही वाचा: कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांचे थवे

पक्ष्यांमध्ये आणखी एक खास वैशिष्ट्य असतं. ते म्हणजे त्यांच्या पायाची रचना. झाडाच्या फांदीवर बसताना घट्ट पकड बसावी या दृष्टीने त्यांना निसर्गाने दिलेली देण आहे. यामुळे पक्ष्यांना झाड्यावर व्यवस्थितरित्या बसता येतं.

Web Title: Interesting Facts Of Birds Why Birds Are Not Falling During Sleep

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :birdsSleep