Kerala Train incident : "नजर हटी.." चालकाला ट्रेन रिव्हर्स मध्ये चालवायला लागली, जाणून घ्या कारण..

प्रवासी चिडलेच होते पण तेवढ्यात लक्षात आलं अन्...
Railway robbery
Railway robbery sakal

केरळमधल्या शोरानूरकडे जाणारी एक ट्रेन स्टेशनवर थांबणार होती, मात्र ती थांबली नाही. पण काही मिनिटांतच ही ट्रेन एक किलोमीटर मागे आली आणि त्यामुळे प्रवाशांचा राग आवरणं शक्य झालं. तिरुवनंतपुरमवरुन निघालेली वेनाड एक्सप्रेस चेरियानाड इथं थांबणार होती, प्रवासी वाटही बघत होते, पण पाहता पाहता ही गाडी पुढे निघून गेली.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चेरियानाड स्टेशन हे एक हॉल्ट स्टेशन आहे, त्यामुळे इथं कोणताही सिग्नल नाहीये. लोको पायलट्सकडूनही चूक होऊ शकते, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. जेव्हा पायलट्सच्या लक्षात आलं तेव्हा गाडी काही अंतर पुढे गेली होती. त्यामुळे त्यांनी जवळपास एक किलोमीटर अंतर गाडी रिवर्स केली. (Trending News)

Railway robbery
Domicile Certificate : शाळा कॉलेजचं अॅडमिशन ते स्पर्धा परीक्षा; सगळ्यासाठी लागणारं डोमिसाईल कसं काढायचं?

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांची यामुळे गैरसोय झाली नाही. मागे येऊन गाडी व्यवस्थित थांबली, त्यामुळे सगळे प्रवासी व्यवस्थित खाली उतरू शकले, तसंच चढूही शकते. नियमानुसार, या लोको पायलट्सची चौकशी होणार असून या घटनेचा अहवाल मागवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com