
Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या देशभरात चर्चेत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'गद्दार' संबोधल्यानं मोठं वादळ उठलं आहे. शिवसैनिकांकडून तोडफोड आणि धमक्यांनी हा विषय गाजला. तसंच कुणाल कामरानं याप्रकरणी तातडीनं माफी मागावी अशी मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण आता कुणाल कामरानं खरोखरच माफी मागितली आहे.