

बिबट्यांच्या खास क्षणात अचानक बस समोर आली आणि व्हिडिओ क्षणात व्हायरल! नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
esakal
Viral Video Trends Leopard : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बिबट्या आणि वाघांच्या व्हिडिओंची अक्षरशः रेलचेल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात नाशिकपासून कोल्हापूर, नागपूरपर्यंत नागरी वस्तीत दिसणाऱ्या बिबट्यांमुळे वनविभागाची चिंता वाढली असून नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. अशातच, कर्नाटकातील जंगल सफारीदरम्यानचा एक थरारक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.