Video : सायकल चालवताना पडला पण....'या' चिमुकल्याचा स्वॅग बघाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Video : सायकल चालवताना पडला पण...'या' चिमुकल्याचा स्वॅग बघाच!

एका चिमुकल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सायकलवरून पडलेला हा चिमुकला परत उठून नाचताना आपल्याला दिसत आहे. हा प्रेरणादायी व्हिडिओ आणि या चिमुकल्याचा स्वॅग आपल्याला कायम प्रेरणा देत राहील हे नक्की. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही चिमुकल्याचा गर्व वाटल्याशिवाय राहणार नाही.

(Little Boy Fell off Bicycle Viral Video)

व्हायर होत असलेला हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती समोर आली नसून यासंदर्भातील अधिक माहितीही उपलब्ध नाही. पण या चिमुकल्याचा स्वॅग पाहून तुम्हालाही आनंद वाटेल. सायकल चालवत असताना पडल्यानंतर काही मुले रडताना किंवा विव्हळताना दिसतात. पण या चिमुकल्याने डान्स सुरू केल्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहताना आपल्याला जेवढा आनंद होतो तेवढाच प्रेरणादायी हा व्हिडिओ आहे. कारण जीवनात संकटे आली किंवा एखाद्या गोष्टीत हार पत्करावी लागली तर काहीजण लगेच नाराज होतात. त्यांच्यासाठी हा मोठा धडा असून लहान लहान पराभवाला कसं सामोरं गेलं पाहिजे याचं हे जिवंत उदाहरण आहे.

Web Title: Little Boy Dance After Fell Off Bicycle Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bicycleviral video