

3-Year-Old Boy Reaches Police Station to Complain Against Mother
esakal
3-Year-Old Boy Reaches Police Station to Complain Against Mother : मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात झालेली एक घटना सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ही घटना जरी २०२२ मधील असली, तरी तिचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. ढेढतलाई पोलीस चौकीत एका अवघ्या तीन वर्षांच्या मुलाने आपल्या आईविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी हजर झाला होता. त्याच्या तक्रारीचे कारण ऐकून उपस्थित सगळेच हसू लागले.