Mahashivratri 2023 : जगातील सर्वात मोठे नैसर्गिक शिवलिंग भारतात; येथे आपोआप वाढतो शिवलिंगाचा आकार

जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगाची निर्मिती आणि स्थापना करण्यात आली आहे, ज्यांचे स्वतःचे महत्त्व आणि खास वैशिष्ट्ये आहेत
Mahashivratri 2023
Mahashivratri 2023esakal

Mahashivratri 2023 : महादेवाचा पवित्र सण महाशिवरात्रीनिमित्त शिवालयात भाविकांची वर्दळ असते. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक भोलेनाथाच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी शिवमंदिरात जातात. शिवजींची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत जिथे केवळ महाशिवरात्रीलाच नाही तर दररोज भाविक दर्शनासाठी येतात. यासोबतच जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगाची निर्मिती आणि स्थापना करण्यात आली आहे, ज्यांचे स्वतःचे महत्त्व आणि खास वैशिष्ट्ये आहेत.

पण छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यातील मदौरा गावाच्या घनदाट जंगलात एक विशाल शिवलिंग आहे. हे शिवलिंग अगदी प्राकृतिकरित्या तयार झालेले आहे. याला 'भूतेश्वर नाथ' असेही म्हणतात. हे केवळ भारताचेच नाही तर जगाचे असे शिवलिंग आहे जे विशाल आणि नैसर्गिक आहे.

भूतेश्वरनाथ शिवलिंगाचा आकार

हे शिवलिंग जमिनीपासून सुमारे 18 फूट उंच आणि 20 फूट गोलाकार आहे. असे म्हणतात की हे शिवलिंग दरवर्षी 6-8 इंच वाढत आहे. राजस्व विभागाकडून दरवर्षी शिवलिंगाची उंची मोजली जाते.

भुतेश्वरनाथ शिवलिंगाचा असा आहे इतिहास

या ठिकाणी शेकडो वर्षांपूर्वी शोभा सिंग जमीनदार यांचे शेत असल्याचे मानले जाते. शोभा सिंग जेव्हा शेती करायला जायचे तेव्हा त्यांना शेताजवळ ढिगाऱ्यासारखा आकार दिसायचा आणि त्यांना बैलाच्या गर्जना आणि सिंहाच्या डरकाळ्याचे आवाजही ऐकू यायचे. शोभा सिंह यांनी हे आवाज अनेकदा ऐकले आणि शेवटी गावकऱ्यांना हा प्रकार सांगितला.

यानंतर गावकऱ्यांनी वन्य प्राण्याचा शोध सुरू केला. दूरवर एकही प्राणी दिसला नाही, तेव्हा गावकऱ्यांचा या जागेशी आदरभाव जडला. जमिनीतून बाहेर पडलेल्या ढिगाऱ्याला लोक शिवलिंगाचे रूप मानून पूजा करू लागले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला हा ढिगारा खूपच लहान होता आणि त्याची उंची आणि गोलाकारपणाही कमी होता, जो हळूहळू वाढू लागला आणि आजही वाढत आहे. (Mahashivratri)

Mahashivratri 2023
Mahashivratri 2023 : यंदा महाशिवरात्रीला या 3 राशींवर असेल महादेवाची कृपा, मिळेल भाग्याची साथ...

भूतेश्वरनाथ शिवलिंगाशी संबंधित पौराणिक मान्यता

चुरा नरेश बिंद्रनवागढचे पूर्वज येथे पूजा करत होते, असे सांगितले जाते. शिवलिंगावर हलकी भेग पडली आहे, त्यामुळे ते अर्धनारीश्वराचे रूप मानले जाते. गरियाबंद जिल्ह्यातील भुतेश्वर महादेव येथे महाशिवरात्री, वसंत महिन्यात आणि विशेष प्रसंगी जत्रा भरते आणि भाविकांची मोठी गर्दी जमते. (Lord Shiv)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com