Nano-Thar Accident : टाटांच्या गाड्यांचा नादच नाय; छोटूशा नॅनोला धडकून उलटली थार

mahindra thar tata nano accident thar upside down on road in chhattisgarh photo goes viral
mahindra thar tata nano accident thar upside down on road in chhattisgarh photo goes viral

Nano-Thar Accident News : लहान कारच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. लहान कारच्या तुलनेत मोठ्या चार चाकी गाड्या या सुपर स्ट्राँग मानल्या जातात. मात्र छत्तीसगडमध्ये मात्र एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.

छत्तीसगडच्या दुर्ग शहरात महिंद्रा थार आणि टाटा नॅनोची टक्कर झाली आणि त्यानंतरचे दृश्य पाहून लोक थक्क झाले. टाटा नॅनोला झालेल्या अपघातानंतर महिंद्रा थार चक्क रस्त्यावर उलटलेली दिसली.

महिंद्रा थार भरधाव वेगाने येत होती. अचानक समोरून येणाऱ्या टाटा नॅनोला तीने धडक दिली. यानंतर महिंद्रा थार रस्त्याच्या मधोमध उलटी पडलेली दिसली.टाटा नॅनोचा पुढील भागाचे थोडेसे नुकसान झाल्याचे दिसत आहे. या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

mahindra thar tata nano accident thar upside down on road in chhattisgarh photo goes viral
Shiv Jayanti : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोघे शिवप्रेमी जागीच ठार

या अपघाताचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये महिंद्रा थार रस्त्यावर उलटी पडलेली दिसत आहे. त्याचवेळी टाटा नॅनोच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. टाटा नॅनोचे इंजिन मागील बाजूस असल्यामुळे त्याचे फारसे नुकसान झाले नाही. या अपघातानंतर रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सध्या या अपघाताबाबत पोलिसांत कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.

mahindra thar tata nano accident thar upside down on road in chhattisgarh photo goes viral
Shiv Sena Bhawan : निवडणूक चिन्ह मिळालं, पण शिंदे शिवसेना भवनावर दावा करू शकणार नाहीत!

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पद्मनाभपूर मिनी स्टेडियमजवळ दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. या अपघातात टाटा नॅनो आणि महिंद्रा थार एकमेकांवर आदळली, त्यानंतर थार उलटली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित झालेली नाही. तसेच दोन्ही वाहनांच्या मालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com