Mangaluru Mobile Puncture Service
esakal
आपल्या देशात जुगाड आणि कल्पकतेची कमी नाही. याचाच प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओतून येत आहे. कर्नाटकातील मंगलुरू शहरातील एका तरुणाने आपल्या दुचाकीलाच फिरतं पंक्चर दुरुस्ती केंद्र बनवलं आहे. त्याच्या या भन्नाट कल्पनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.