Viral Video : नाद खुळा मार्केटिंग! टिकाऊपणा दाखवण्यासाठी खुर्चीवर घातला टेम्पो

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral Video Sakal

बोलणाऱ्याची मातीही विकली जाते अन् न बोलणाऱ्याचे सोनं विकलं जात नाही अशी म्हण गावाखेड्यामध्ये चांगलीच प्रचलित आहे. अनेकजण आपल्या बोलण्याचं कसब वापरून वस्तू विक्री करत असतात. बसमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करताना असे विक्रेते आपण अनेकदा पाहिलेही असतील, सध्या अशाच एका विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक खुर्ची विक्रेता ग्राहकांना खुर्ची दाखवत आहे. तर खुर्चीची लवचिकता ग्राहकांना पटवून देण्यासाठी तो टेम्पोच्या चाकाखाली खुर्ची ठेवून त्यावरून टेम्पो घालतो. पण तरीही खुर्चीला काही होत नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

दरम्यान, ग्राहकांना वस्तूंचा टिकाऊपणा दाखवण्यासाठी विक्रेते काय करतील त्याचा नेम नसतो. सध्या हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर १.५ दशलक्ष लोकांनी लाईक केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com