Kashibai Shinde
esakal
दिवाळी म्हटलं की घरात आनंद, उत्साह आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर सणाच्या दिवशी आनंद पाहायचा असतो. त्यासाठी ते आपल्यापरीने प्रयत्नही करतात. पण मुलीची दिवाळी साजरी करता यावी म्हणून एका ७० वर्षीय आईने चक्क स्वतःची शेळी विकल्याची घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील शेळी बाजारात घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.