Video: विमानात धोनीला पाहून आनंद गगनात मावेना; एअर होस्टेसनं नकळत बनवला व्हिडिओ

सोशल मीडियात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
Video: विमानात धोनीला पाहून आनंद गगनात मावेना; एअर होस्टेसनं नकळत बनवला व्हिडिओ

नवी दिल्ली : महेंद्र सिंह धोनी... नाव तर ऐकलंच असेल! धोनी समोर दिसला आणि तुम्हाला त्याला भेटण्याचा किंवा त्याच्यासोबत फोटो घेण्याचा मोह आवरलाच नाही असं होणार नाही, मग तो कोणीही असो. असा वेगळाच ऑरा आहे धोनीचा. त्यामुळेच की काय विमानात आपल्या सीटवर झोपलेल्या धोनीला पाहून एका एअर होस्टेसचा आनंद गगनात मावेना. त्यामुळं तिनं त्याच्या नकळत व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (MS Dhoni sleeping in Flight video made by air hostess)

Video: विमानात धोनीला पाहून आनंद गगनात मावेना; एअर होस्टेसनं नकळत बनवला व्हिडिओ
Jaipur-Mumbai Exp Firing: प्रवाशांसोबत वाद नव्हता, 'या' कारणामुळं कॉन्स्टेबलनं झाडल्या गोळ्या; रेल्वे पोलीस आयुक्तांची माहिती

व्हिडिओत काय आहे?

ज्या विमानातून धोनी प्रवास करत होता त्यात तो पहिल्याच रांगेतील सीटवर बसला होता. बसल्यानंतर त्याला झोप लागली. पण धोनी ज्या रांगेत बसला होता ती रांग एअर होस्टेसच्या एरियाशी लागत होती. त्यामुळं विमानात जिथं एअर होस्टेसना थांबवण्यासाठीची जागा असते तिथून सीटवर झोपलेला धोनीचं सहज दर्शन होतं होतं. त्यामुळं या एअर होस्टेसनं आपल्या जागेवरुन मोबाईलमध्ये झोपलेल्या धोनीच्याच काय इतर कोणत्याही प्रवाशाच्या नकळत एक व्हिडिओ शूट केला.

Video: विमानात धोनीला पाहून आनंद गगनात मावेना; एअर होस्टेसनं नकळत बनवला व्हिडिओ
Shirsat Vs Chaturvedi: "...जर आम्ही चारित्र्य काढलं तर बात लंबी चलेगी"; शिरसाटांचं चतुर्वेदींना प्रत्युत्तर

पण या व्हिडिओमध्ये संबंधित एअर होस्टेसच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतो. त्यामुळेच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर आणि प्रेमळ कमेंट्सही केल्या आहेत. तर काहींनी तिला झापलंही आहे. जर असा प्रकार एखाद्या पुरुषानं केला असता तर काय झालं असतं? तसेच हा गोपनियतेचा भंग असल्याचं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com