
तणाव आणि निराशेमध्ये तुमच्या भावनांना मोकळे करायचे आहे का? भारतातील महानगरांनी एक उपाय शोधून काढला आहे. ते म्हणजे क्रायिंग क्लब... याची सुरूवात मुंबईत नुकतीच केली आहे. तर दिल्ली, बेंगळुरूमध्ये आधीच त्यांचे पर्याय आहेत. पण आता अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. क्रायिंग क्लब म्हणजे काय? ते का लोकप्रिय होत आहेत? त्यामागे विज्ञान आहे का? संकल्पना काय आहे? या सर्व पश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.