Viral Video : देवदूत बनून धावला टीसी, वृद्ध महिला प्रवाशाचे वाचवले प्राण, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Mumbai Local Train : कुर्ला रेल्वे स्टेशनवर वृद्ध महिला लोकलमधून उतरताना तोल जाऊन ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकण्याची वेळ आली. ठाणे-सीएसएमटी लोकल थांबल्यानंतर गर्दीमुळे तिचा पाय घसरला. जवळच असलेल्या टीसीने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.
Viral Video : देवदूत बनून धावला टीसी, वृद्ध महिला प्रवाशाचे वाचवले प्राण, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
Updated on

Mumbai Local Rescue : बईतील लोकल ट्रेनच्या गर्दीत कुर्ला रेल्वे स्टेशनवरून माणुसकीचे एक उदाहरण समोर आले आहे. ठाणे-सीएसएमटी लोकल ट्रेनमधून उतरताना एका वृद्ध महिला प्रवाशाचा अचानक तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकणार होती तितक्यात स्टेशनवर असलेल्या एका तिकीट तपासनीसाने (टीसी) क्षणाचाही वेळ न घालवता घटनास्थळी धाव घेतली तिचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com