Ahmedabad Viral Video : “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है” म्हणताच प्राध्यापक भडकले; विद्यार्थ्याची स्टेजवरच धरली गचांडी, VIDEO VIRAL

Nirma University Clash : प्राध्यापक मंचावर येण्यास विलंब झाल्याने एका विद्यार्थ्याने ‘गोलमाल ३’ चित्रपटातील “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है” हा संवाद गमतीने म्हटला. विद्यार्थ्याच्या या वक्तव्यामुळे प्राध्यापक संतापले.
Ahmedabad Viral Video : “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है” म्हणताच प्राध्यापक भडकले; विद्यार्थ्याची स्टेजवरच धरली गचांडी, VIDEO VIRAL
Updated on: 

गुजरातच्या अहमदाबादमधील निरमा विद्यापीठातील एका घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यात प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील वादाचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात प्राध्यापक विद्यार्थ्याचा कॉलर पकडताना दिसत आहेत. हा वाद विद्यापीठाने आयोजित केलेल्या 'टेक्नोफ्रा २०२६' (Technofra 2026) या तीन दिवसीय तांत्रिक आणि सांस्कृतिक महोत्सवादरम्यान झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com