"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

PAKISTAN GANESHOTSAV: पाकिस्तानातील कराची येथील मुस्लिम मूर्तीकाराचा गणपती बाप्पाची मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pakistan Ganesh Idol Viral Video: Muslim Artist Breaks Religious Barriers to Paint Bappa Idol

Pakistan Ganesh Idol Viral Video: Muslim Artist Breaks Religious Barriers to Paint Bappa Idol

sakal

Updated on

GANPATI BAPPA IN PAKISTAN: गणेशोत्सवाला आता अवघे ५ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर गणेशोत्सव आणि गणपती बाप्पाशी संबंधित विविध कंटेंटची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून पाकिस्तानातील गणेशोत्सवही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अशातच सध्या व्हायरल होत असलेल्या एका क्रिएटरच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये कराचीतील एक मुस्लिम मूर्तीकार गणरायाची नयनरम्य मूर्ती अत्यंत श्रद्धेने आणि कौशल्याने घडवताना दिसत आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन बाप्पाची मूर्ती साकारतानाचा हा क्षण पाहून नेटकऱ्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com