

Six-Year-Old Aditya Starts Protest in Patna
esakal
Six-Year-Old Boy Protest: बिहारची राजधानी पाटण्यात एका सहा वर्षांच्या मुलाने धरणे आंदोलन सुरु केले आहे, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले लोक थक्क झाले. आपल्या पालकांवर झालेल्या कथित हल्ल्यामुळे व्यथित होऊन या मुलाने धरणे आंदोलन सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन न्याय मिळेपर्यंत आपण हे आंदोलन थांबवणार नाही, असा त्याने ठाम निर्धार केला आहे.