Expensive Pink Diamond: 413 कोटींचा गुलाबी हिरा! हिऱ्याच्या विक्रीने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

हिऱ्याची प्रति कॅरेट किंमत जगातील सर्वाधिक असून या हिऱ्याने वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे
Expensive Pink Diamond:
Expensive Pink Diamond: esakal

Hong Kong: हाँग काँगमध्ये काही दिवसांआधी दुर्मिळ हिऱ्याचा लिलाव करण्यात आला. विक्रीनंतर या हिऱ्याची जी किंमत आली त्याने वर्ल्ड रेकॉर्डच तोडला. हाँग काँगमधील हा दूर्मिळ हिरा ४.९९ कोटी डॉलरमध्ये विकल्या गेला. हिऱ्याची प्रति कॅरेट किंमत जगातील सर्वाधिक असून या हिऱ्याने वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे.

भारतीय करंसीमध्ये या हिऱ्याची किंमत जवळपास ४१३ कोटी एवढी आहे. या गुलाबी हिऱ्याला सोदबी हाँग काँगमध्ये लिलाव करण्यात आलाय. या हिऱ्याची विक्री किंमत ३९.२ कोटी एवढी आहे. विलियमसन पिंक स्टारचं नाव दोन पौराणिक पिंक डायमंड्समध्ये घेतल्या गेलं होतं. पहिला विलियमसन हिरा हा २३.६० कॅरेटचा होता. या हिऱ्याला दिवंगत महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या लग्नाला भेट म्हणून देण्यात आलं होतं.

Expensive Pink Diamond:
Hong Kong Open : हाँगकाँगमध्ये अजूनही कोरोना विलगीकरण, सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धा रद्द

दुसरा गुलाबी हिरा हा ५९.६० कॅरेटचा आहे. २०१७ मध्ये झालेल्या लिलावामध्ये हा हिरा ७.१२ कोटी डॉलरमध्ये विकल्या गेला. विलियमसन पिंक स्टार ऑक्शनमध्ये येणारा हा जगातील दुसरा सगळ्यात मोठा गुलाबी हिरा आहे. गुलाबी हिरा हा रंगीत हिऱ्यांमधला सगळ्यात महागडा हिरा आहे. यावर्षी जगातील पांढरा हिरा 'द रॉक' जगात सगळ्यात महाग विकल्या गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com