Viral Video: बाप लेकाची हृदयस्पर्शी कहाणी! वडिलांसाठी Postgraduate मुलगा करतोय 'हे' काम

आपल्या ६५ वर्षीय वडिलांसाची मदत करण्यासाठी टॅक्सी चालवत असल्याचे मुलाने सांगितले
Viral Video
Viral Videoesakal

Inspirational Story: वडिल म्हणजे घरचा कर्ता धर्ता आणि वडिल म्हणजे घराचा पोशिंदा असं कायम म्हटलं जातं. पत्नी, मुले सगळ्यांच्या गरजा समजून घेत झटणारे वडिल असतात. मुलांसाठी कधी कधी स्वत:च्या पोटाला चिमटा घेत ते वाटेल ते करतात. मात्र आजच्या तरूण पिढीत फार कमी मुले स्वत:च्या विचारांपलीकडे जाऊन वडिलांसाठी काहीतरी मोलाची कामगिरी करतात. होय! IAS अवनीश शरण यांनी नुकतीच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये एक हाय कॉलीफाइड मुलगा वडिलांसाठी टॅक्सी ड्रायव्हरचं काम करतो.

वृद्ध वडिलांची मदत करण्यासाठी पोस्टग्रॅज्युएट मुलगा झाला टॅक्सी ड्रायव्हार

अवनीश यांनी दोन मिनीटांची एक व्हिडीओ क्लिप शेअर केलीय. समाजाला प्रेरणा देणाराहा व्हिडीओए देखील खुद्द त्यांनी शुट करत या कर्तुत्ववान मुलाच्या प्रतिक्रियाही घेतल्या आहेत. दिल्लीच्या या टॅक्सी ड्रायव्हर मुलाने सांगितले की, त्याचं प्रोफेशनल टॅक्सी ड्रायव्हर नसून तो आपल्या ६५ वर्षीय वडिलांसाची मदत करण्यासाठी टॅक्सी चालवत असल्याचे त्याने सांगितले.

पुढे तो सांगतो, टॅक्सी ड्रायव्हिंग व्यतिरिक्त तो मार्केटिंगमध्ये आईपी विद्यालयातून पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. मात्र वडिलांना हातभार लागावा त्यांची मदत व्हावी म्हणून तो टॅक्सी चालवतो. एवढेच नव्हे तर यासोबतच तो नोकरीदेखील करतो.

मागल्या सात वर्षांपासून ई-कॉमर्स कंपनीसोबत काम करतोय

हा मुलगा मागल्या सात वर्षांपासून एका ई-कॉमर्स कंपनीमध्ये काम करतोय. मात्र तरी केवळ वडिलांची मदत व्हावी म्हणून तो टॅक्सी चालवतो. वयाच्या १८व्या वर्षी जेव्हा हा मुलगा शिकत होता तेव्हापासून त्याने वडिलांच्या मदतीसाठी टॅक्सी चालवायला सुरूवात केली होती. एवढेच नव्हे तर राज्यस्तरीय क्रिकेट टीमसह अंडर १९ दिल्ली टीम सोबतही तो खेळला आहे.

Viral Video
Viral Poster: 20 रुपयांत पेट्रोल देईल! मला निवडून द्या..'या' सरपंचाच्या निवडणुकीचं पोस्टर व्हायरल

आजही यशस्वी होण्याचं आईवडिलांना देतो श्रेय

ड्रायव्हर मुलगा आज त्याच्या आयुष्यात यशस्वी आहे मात्र याचं सगळं श्रेय तो त्याच्या आईवडिलांना देतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा तो त्याच्या आईवडिलांची मदत करतो. तसेच यापुढे देखील कितीही मोठ्या पदावर पोहोचलो तरी आईवडिलांची मदत कायम करत राहिल असेही त्याने व्हिडीओमध्ये म्हटलेले दिसते. मुलाच्या या प्रेरणादायी व्हिडीओला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सने त्याचे कौतुकही केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com