पुणे तिथे काय उणे! पुणेकरांना झालं पांढऱ्या कावळ्याचं दर्शन; Video Viral | White Crow

पुण्यात पांढऱ्या रंगाचा कावळा आढळून आला आहे.
White Crow
White CrowSakal

Pune White Crow Video : पुणे तिथे काय उणे! असं आपण कित्येकदा म्हणतो. पण या म्हणीचा अर्थ अनेकदा खरा ठरतो. कारण सध्या पुण्यात पांढऱ्या रंगाच्या कावळ्याचे दर्शन झाले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

White Crow
Viral Video : रील बनवताना तरूणीचा कारनामा! डोळ्यात पिळलं लिंबू अन् कॅमेऱ्यासमोरच...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही काळ्या रंगाचे कावळे आणि त्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचा पक्षी दिसत आहे. तो पक्षी कावळ्यासारखाच दिसत असून कावळ्यांच्याच थव्यामध्ये आहे. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी हा व्हिडिओ शूट केला असून अनेकांना या व्हिडिओवर प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, पुण्यातील लुल्लानगर भागातील हे दृश्य असून हा कावळा आहे की दुसरा पक्षी आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रथमदर्शनी हा कावळा असल्याचं दिसत असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. पण कावळ्याचा रंग पांढरा कसा हा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com