Viral Video : जोमात आलेलं पीक अन् शेतकरी महिलेचा भन्नाट डान्स

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तर अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला जातो. एखादं पीक चांगलं येणे आणि शेतकरी खूश होणे हे कमी वेळा पाहायला मिळतं. तर सध्या अशाच एका शेतकरी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
Viral Video : हातात सिगारेट घेत तरूणींनी केला राष्ट्रगीताचा अपमान

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मोहरीच्या शेतातील असून हे जोमात आलेले पीक पाहून महिला भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तर या महिलेच्या डान्सचा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या महिलेचा आनंद पाहून आपल्यालाही समाधान वाटेल.

दरम्यान, या व्हिडिओला २ लाख ७० हजार लोकांनी लाईक केलं असून चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अनेक लोकांनी या व्हिडिओला शेअर केलं असून शेतकरी महिलेचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com