Why America Supports Pakistan
esakal
संकटाच्या काळात अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला धावत असल्याचा इतिहास आहे. यासंदर्भात भारत सरकारने अनेकदा अमेरिकेकडे नाराजीदेखील व्यक्त केली आहे. मात्र, त्याचा कोणताही परिणाम अमेरिकेवर झाला नाही. अमेरिकेकडून पाकिस्तानला सातत्याने पैसा आणि शस्त्र पुरवठा केला जातो आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिका आणि भारताचे संबंध ही बऱ्यापैकी चांगले आहेत. मात्र, तरीही अमेरिकेकडून पाकिस्तानला का मदत केली जाते? असा प्रश्न उपस्थित होतो. याबाबतची आतली गोष्टी आता बाहेर आली आहे.