

Omprakash Bishnoi Sarpanch Election Result
esakal
What Omprakash Bishnoi Said After Defeat : राजस्थानमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर होत असताना एका उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या या उमेदवाराला प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र मतदारांचा अपेक्षित पाठिंबा मिळू शकला नाही. राजस्थानमधील फलोदी येथील ओमप्रकाश बिष्णोई यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत अवघी ३३ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर त्यांचे २१ लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि सबस्क्राइबर्स आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा