Viral Video : होळीचा रंग खेळल्यानंतर तरूणीचा बुलेटवर बॉयफ्रेंडसोबत रोमान्स

Viral Video
Viral VideoSakal

गाडीवर रोमान्स करणारे अनेक जोडपे आपण पाहिले असतील. गाडीवर तरूणी तरूणाच्या मांडीवर उलटी बसून रोमान्स करतानाचे अनेक व्हिडिओ याआधी व्हायरल झाले आहेत. पण सध्या एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये तरूणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत होळीच्या दिवशी रोमान्स करताना दिसत आहे.

Viral Video
नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

व्हायरल व्हिडिओ हा होळीच्या दिवशीचा असून राजस्थानातील जयपूर येथील असल्याची माहिती आहे. यामध्ये एक तरूणी पेट्रोलच्या टाकीवर बसून तरूणासोबत रोमान्स करताना दिसत आहे. तर दोघेही रंगाने माखलेले आहेत. पाठीमागील चारचाकीमध्ये बसलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरूणांचा शोध सुरू केला असून त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. याआधी छत्रपती संभाजीनगर येथील एका तरूणाचा आणि तरूणीचा असाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला पोलिसांनी शोधून माफी मागायला लावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com