Viral Video : आरती सुरु असतानाच पुजाऱ्याला हृदयविकाराच्या झटका, जागेवरच मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Heart Attack During Aarti : व्हायरल व्हिडिओमध्ये ते छाती पकडून खाली कोसळताना दिसत आहेत. उपस्थित भाविकांनी तत्काळ मदत करून रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या अचानक निधनाने परिसरात शोककळा पसरली असून भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली.
Heart Attack During Aarti

A Ranchi priest died of a heart attack during aarti at a temple, shocking devotees.

esakal

Updated on

Priest Dies During Evening Aarti in Ranchi Temple Video Viral : झारखंडची राजधानी रांचीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात आरती करताना एका पुजाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना रातू रोडच्या इंद्रपुरी रोड क्रमांक 9 वर असलेल्या मंदिर घडली. आचार्य रजनीकांत मिश्रा असे पुजाऱ्याचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पुजारी छातीला धरून खाली पडला आणि त्याचा तत्काळ मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com