Viral Video : दंडाच्या भीतीने बाईक जोरात पळवली, पत्नी रस्त्यावर कोसळली तरी मागे वळूनही पाहिले नाही; पतीच्या कारनाम्याचा थरारक VIDEO VIRAL

Traffic Police Checking : वेग वाढल्यामुळे मागे बसलेली त्याची पत्नी रस्त्याच्या मध्यभागी पडली. पत्नी पडलेली पाहूनही पतीने दुचाकी थांबवली नाही आणि तिथेच सोडून निघून गेला. वाहतूक पोलिसांनी तातडीने महिलेला उठवून सुरक्षित ठिकाणी नेले आणि विचारपूस केली.
Viral Video Shows Wife Falling From Motorcycle

Viral Video Shows Wife Falling From Motorcycle

esakal

Updated on: 

What Happened at Rudrapur Trishul Chowk? : उत्तराखंडमधील रुद्रपूर येथील त्रिशूल चौकात घडलेल्या एका विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूक पोलिसांकडून होणारी कारवाई टाळण्याच्या प्रयत्नात एका दुचाकीस्वाराने स्वतःसह पत्नीचाही जीव धोक्यात घातला. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिल्यानंतर या व्यक्तीने दुचाकीचा वेग वाढवला. यावेळी मागे बसलेली त्याची पत्नी चालत्या दुचाकीवरून रस्त्यावर पडली. मात्र, पत्नीला पडलेली पाहूनही पतीने दुचाकी थांबवली नाही. या घटनेनंतर नेटकरी त्याच्या बेजबाबदार वर्तनावर टीका करत आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com