Sheep Viral Video : मेंढ्या अडकल्या चक्रव्ह्यूहात, समोर आलं धक्कादायक कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sheep Viral Video

Sheep Viral Video : मेंढ्या अडकल्या चक्रव्ह्यूहात, समोर आलं धक्कादायक कारण

Sheep Mystery Viral Video : प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही शिकारीचे, काही मजेशीर, काही हसवाणे, तर काही विचारात पाडणारे असतात. पण गेले काही दिवस एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संपीर्ण जगालाच कोड्यात टाकणारा हा व्हिडीओ होता.

हा व्हिडीओ मेंढ्यांचा आहे. मेंढ्यांसारखे काय एका मागोमाग चालताय, असा वाकप्रचार आपण वापरतो. कारअ एक मेंढी गेली की, विचार न करता तिच्यामागेच बाकीच्या जातात. या व्हिडीओत दिसतानापण तसंच दिसतय, पण हा प्रकार थोडा वेगळा आहे.

हेही वाचा: Viral Video : काड्या करणारे लोक! आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

या व्हिडीओत मात्र मेंढ्या गोलगोल फिरत आहेत. एकाच वर्तुळात त्या फिरताना दिसत आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेंढ्या गोलाकार फिरताना दिसत आहेत. मोठं वर्तुळ त्यांनी केलं आहे आणि याच वर्तुळाभोवती त्या फिरत आहेत.

हेही वाचा: Viral Video : ऐतिहासिक वास्तूंचा अपमान करणाऱ्यांना शिकवला धडा, आपण सुद्धा शिकलं पाहिजे

काही मेंढ्या त्यांच्या आजूबाजूला उभ्या आहेत. तर याच व्हिडीओच्या पुढील व्हिडीओत जो एका कॅमेऱ्यात शूट करण्यात आला आहे. त्यामध्ये काही मेंढ्या त्या वर्तुळाच्या आतही दिसत आहेत. माहितीनुसार या मेंढ्या काही खातपितही नाही आहेत. पण तरी त्या ठणठणीत आहेत.

हेही वाचा: Viral News: मृत बाळाला तोंडात घेऊन रुग्णालयात फिरत होता कुत्रा!

पीपील्स डेली चाइनाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार उत्तर चीनच्या मंगोलियातील ही घटना आहे. शेकडो मेंढ्या दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस एका वर्तुळात गोलगोल फिरत आहे. मेंढ्या तशा निरोगी आहेत पण त्यांच्या या विचित्र वागण्याचं रहस्य बनलं.

मीडिया रिपोर्टनुसार मेंढ्यांचा मालकही हैराण झाला. त्याने सांगितलं की सुरुवातीला काही मेंढ्या असं करत होत्या पण आता संपूर्ण कळप असा करू लागला आहे. त्यांच्या या वागणुकीचं कारण त्यांनाही माहिती नाही.

तज्ज्ञांच्या मते, लिस्टेरियोसिस नावाच्या एका जीवाणूजन्य आजारामुळे प्राण्यांचं व्यवहार असा होतो. या आजाराच त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. मेंदूला सूज येते आणि मग भटकल्यासारखं वाटतं, शरीरारला लकवाही मारू शकतो.

टॅग्स :viral video