
सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे
जेवणाच्या डब्ब्याच्या झाकणात अक्षरशः अळ्या वळवळत आहेत
या व्हिडिओवर भयानक प्रतिक्रिया येत आहेत
Trending Video : शाळेत जाणाऱ्या मुलांना किंवा ऑफिसला नेण्यासाठी आपण जेवणाचे डब्बे तयार करतो. रंगीबेरंगी, आकर्षक डिझाईनचे डब्बे बाजारात पाहून आपण लगेच खरेदी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का हे सुंदर दिसणारे डब्बे आपल्या आणि मुलांच्या जीवावर बेतू शकतात? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या व्हिडीओमध्ये एका जेवणाच्या डब्ब्याच्या झाकणात अक्षरशः अळ्या दिसत आहेत. काही डब्बे असे असतात ज्यांची नीट स्वच्छता होत नाही. परिणामी त्यात किडे किंवा अळ्या तयार होऊ शकतात. जर अशा डब्ब्यातील अन्न मुलांनी किंवा आपण खाल्लं तर गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. हा व्हिडीओ ‘wasim_shaikh1137’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून यावर नेटकऱ्यांच्या हजारोच्या संख्येने प्रतिक्रिया येत आहेत.