Viral Video : अरे अरे अरे! "...अन् त्या दिवशी चक्क तीन जणांचे लग्न झाले"

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

लग्न हा सर्वांच्या आवडीचा विषय असतो. तर लग्नामध्ये प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतो. लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये नवरदेवाने भटजीसोबत गंम्मत केल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्नातील एक विधी सुरू असल्याचं दिसत आहे. भटजी नवरदेवाच्या हातावर काहीतरी देऊन ते कपाळाला लावायला सांगतात, पण नवरदेव ते नवरीच्या कपाळाला लावायला जातो पण भटजी अडवतात आणि ते त्याच्या स्वत:च्या कपाळाला लावायला सांगतात.

Viral Video
नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

नवरदेवाने आपल्या कपाळाला टिका लावल्यानंतर तो भटजीच्या कपाळाला टिळा लावायला जातो तेव्हा भटजी रागाने त्याचा हात पाठीमागे ढकलतात. त्यानंतर सर्वजण हसू लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. "...अन् त्या दिवशी चक्क तीन जणांचे लग्न झाले" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Viral Video
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना; लाच घेताना अख्खे कृषी अधिकारी कार्यालय अटकेत | Bribe Crime

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com