Trending News: शेतकऱ्याला ५० लाखांचा दंड; गुन्हा काय तर थम्स अपचा इमोजी पाठवला!

आतापासून तुम्हीही कोणताही इमोजी पाठवण्यापूर्वी ५ वेळा विचार करा!
Thumbs Up Emoji
Thumbs Up EmojiSakal

सोशल मीडिया अॅप्सवर चॅट करताना प्रत्येकजण इमोजी वापरतो. काही लोक शब्दांपेक्षा इमोजी जास्त वापरतात. ओके लिहिण्याऐवजी थम्स अप पाठवतो. जवळजवळ प्रत्येक भावनांसाठी एक इमोजी आहे. कॅनडामध्ये इमोजी पाठवताना एका शेतकऱ्याला आता ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडातील सस्काचेवान इथल्या एका शेतकऱ्याला हा दंड ठोठावण्यात आला होता. शेतकऱ्याने रिप्लाय म्हणून थम्स अप इमोजी पाठवला, ही छोटीशी चूक शेतकऱ्याकडून झाली. ख्रिस अॅक्टर नावाच्या व्यक्तीनं स्पष्ट केलं की त्याने ही चूक मान्य केली आहे. (Global News)

Thumbs Up Emoji
Trending News: चोर असला म्हणुनी काय जाहले...; हनुमान चालिसा म्हटली, दानपेटीत पैसे टाकले अन् पेटीच लुटली!

विशेष म्हणजे, न्यायमूर्तींनी सांगितलं की त्यांनी दंडाला सहमती दिली. आता या शेतकऱ्याला ८२ हजार डॉलर्स (सुमारे ५० लाख रुपये) दंड भरावा लागेल. केंट मिक्लबरो नावाच्या खरेदीदाराला फ्लॅक्स बियाणे खरेदी करायचं होतं. ख्रिस एक्टर २०२१ मध्ये ग्राहकांना ८६ टन फ्लॅक्स बियाणे वितरित करणार होते.

मिकेलबरो म्हणाले की मी ख्रिस अॅक्टरशी फोनवर बोललो. ख्रिसला नोव्हेंबरपर्यंत फ्लॅक्स बिया वितरित करायला सांगितलं होतं. यानंतर ग्राहकाने कराराचा मसुदा शेतकऱ्याला पाठवला. 'फ्लेक्स सीड्स कॉन्ट्रॅक्टचे कन्फर्मेशन द्या', असं यामध्ये लिहिलं होतं. या मेसेजला रिप्लाय म्हणून शेतकऱ्याने थम्स अप इमोजी पाठवला. शिवाय त्यांनी बियाणं वेळेवर पोहोचवलंही नाही. 

Thumbs Up Emoji
Trending News: सुट्टी एन्जॉय करायला गेलेल्या जोडप्याला कॅब पडली महागात; बिल आलं २४ लाख

 मिकेलबोरोचा दावा आहे की दोघंही बऱ्याच काळापासून व्यवसाय करत आहेत. यापूर्वीही टेक्स्ट मेसेजद्वारे सौद्यांवर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे यावेळीही थम्स अपचा इमोजी म्हणजे हा करार ठरला असा अर्थ घेण्यात आला. न्यायालयानेही थम्स अप सही म्हणून स्विकारलं. त्यामुळे आतापासून तुम्हीही कोणताही इमोजी पाठवण्यापूर्वी ५ वेळा विचार करा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com