

Misbehavior with foreign YouTuber live streaming in Udaipur.
Sakal
आपल्या सुंदर तलावांसाठी आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या उदयपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे रात्रीच्या वेळी लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या 'जस्टकेथ' (JustKeth) या थाई-फ्रेंच महिला युट्यूबरकडे एका तरुणाने थेट कॅमेऱ्यासमोर आक्षेपार्ह मागणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तरुणीने स्पष्ट नकार देऊनही तरुण पुन्हा पुन्हा तीच मागणी करत राहिल्याने इंटरनेटवर संतापाची लाट उसळली आहे.