Viral Video: बायको अन् प्रेयसी रस्त्यावर भिडल्या; नवऱ्याची झाली पंचाईत, दोघींनाही तिथेच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Viral Video: बायको अन् प्रेयसी रस्त्यावर भिडल्या; नवऱ्याची झाली पंचाईत, दोघींनाही तिथेच...

सोशल मीडियावर नवरा बायकोचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण सध्या एक नवरा बायको आणि प्रेयसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. व्हिडीओत बायको आणि प्रेयसी भर रस्त्यावर हाणामारी करताना दिसते. पुढे संतापलेला नवरा असं काही करतो की तुम्हालाही पाहून आश्चर्य वाटेल. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Viral Video : परदेशी मुलीला पटवण्यासाठी भारतीय मुलाने केले असे स्टंट की...

या व्हिडीओत तुम्हाला दोन महिला एकमेकींना मारताना दिसत आहे. पण जेव्हा एक पुरुष या महिलांचा झगडा सोडवायचा प्रयत्न करतो तेव्हा कळते की या दोन महिला या पुरुषाच्या प्रेयसी आणि पत्नी आहेत.

या दोघींची हाणामारी एवढी वाढते की संतापलेल्या नवऱ्याला काय करावं काय नाही, असं होतं. मग काय तर नवरा चक्क या दोघींना चपलेने मारायला लागतो. तरीसुद्धा या दोघी एकमेकींना मारणे थांबवत नाही.

हेही वाचा: Viral Video : मोरासारखे रंगीबेरंगी पंख पसरून नाचताना दिसला कोळी

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. काही नेटकरी म्हणताहेत नवऱ्याने बरोबर केलं तर काहींच्या मते नवऱ्याने दोघींनाही मारायला नको होतं.