
विवाहित महिला प्रियकरासोबत ओयो हॉटेलमध्ये आढळली.
नातेवाईकांनी धाड टाकल्यावर प्रियकर नग्न अवस्थेत पळाला.
हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल; पोलीस तपास सुरू.
Oyo Raid Video : उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका विवाहित महिलेचा तिच्या प्रियकरासोबत असलेला अनैतिक संबंध उघडकीस आला आहे. ही घटना बुधवार २३ जुलैला सिम्भाओली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ओयो (OYO) हॉटेलमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहित महिला काही दिवसांपासून एका पुरुषासोबत गुपचूपपणे भेटत होती. वारंवार बाहेर जाण्याच्या निमित्ताने तिच्या वागणुकीवर कुटुंबातील सदस्यांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. अखेर एका ओयो हॉटेलमध्ये ती प्रियकरासोबत असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी थेट हॉटेलवर धाड टाकली.