VIRAL VIDEO : आई वडील समुद्रकिनाऱ्यावर रील बनवण्यात व्यस्त, मूल लाटांत गंटागळ्या खाऊ लागलं अन्... चीड आणणारा VIDEO VIRAL

Parents Negligence : सोशल मीडियावर रील बनवण्याच्या वेडात पालकांनी मुलाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून दिसून आले आहे. समुद्रकिनाऱ्यावर एक जोडपे रील रेकॉर्ड करत असताना त्यांचे लहान मूल लाटांजवळ गंटागळ्या खात होते.
Viral Video

Viral Beach Reel Video Sparks Child Safety Debate

esakal

Updated on: 

Viral Beach Reel Video Sparks Child Safety Debate : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील बनवण्याचे वेड अनेकदा पाहायला मिळते. मात्र, याच नादात आपल्या जवळच्या व्यक्तीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असेल, तर ही बाब चिंताजनक आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे पालकांच्या जबाबदारीचा आणि रील संस्कृतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर एक जोडपे रील बनवण्यात मग्न असताना त्यांचे लहान मूल समुद्राच्या लाटांच्या अगदी जवळ पोहोचल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी एका तरुणाने प्रसंगावधान राखत मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com