
Viral Car Video : ढगाकडे बघून चालणारी गाडी; कार डिझायनरला २६ तोफांची सलामी!
Viral Car Video : सध्या सगळ्यांना नव नवीन कारची क्रेझ आहे. त्यात कार निर्माते वेग-वेगळ्या डिझाइनच्या कार बाजारात आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम करत असतात.
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
हेही वाचा: Viral News : माकड एक लाख रुपये घेऊन पळाला अन् महिला पहातच राहली, Video
कधी कधी डिझायनरकडून अशा काही डिझाइन केली जातात, जी चर्चेचा विषय बनतात. अशाच एका हटके कार डिझाइनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसणारी कार सरळ आहे उलटी हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला डोळ्यांवर थोडासा जोर द्यावा लागेल.
आकाशाकडे डोळे म्हणजेच चाकं असणारी कार बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून, कार डिझायनरच्या कल्पकतेला अनेकांनी २६ तोफांची सलामी दिली आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक निळ्या आणि पांढऱ्या रंगाची कार रस्त्यावरून धावताना दिसू येत आहे. मात्र, ही कार नेमकी उलटी आहे की, सरळ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण, या कारची चाकं रस्त्यावर नाही तर, आकाशाकडे आहेत. त्यामुळे अनेकांनी कार डिझायनरला सलाम करत त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले आहे.
उलट्या कारचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @BornAKang नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, या व्हिडिओला आतापर्यंत 533.5K व्ह्यूज मिळाले आहेत, तर 39 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे.