Viral News: वैश्यालयाच्या नरकातून सुटका झाली! आता 'ती' बनणार शिक्षिका

एक तरुणी दलालाच्या जाळ्यात फसली आणि अमेरिकेच्या एका नेवादामधील शासकीय अधिकृत वैश्यालयात जाऊन पोहोचली
Viral News
Viral Newsesakal

Viral News: महिलांच्या सुरक्षेबाबत शासन कितीही कठोर झालं तरी मात्र त्यांच्यावरील अत्याचार कमी होताना दिसत नाही. अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एक तरुणी दलालाच्या जाळ्यात फसली आणि अमेरिकेच्या एका नेवादामधील शासकीय अधिकृत वैश्यालयात जाऊन पोहोचली.

वैश्यालयातील एका मॅनेजरच्या मात्र लक्षात आले, या तरुणीला येथे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. या भल्या मॅनेजरने तरुणीची समजूत काढल्यानंतर तरुणीने दलालाचा फोन उचलणे बंद केले. अनेक फोन कॉल्स न उचलल्याने हा लालची दलाल जेव्हा वैश्यालयात पोहोचला तेव्हा हळून मॅनेजरने तरुणीच्या बचावासाठी पोलिसांना बोलावले.

पोलिसांपुढेच तरुणीला विचारण्यात आले की तुला विकणाऱ्या दलालासोबत तुला जायचे आहे की वैश्यालयात राहायचे आहे. तेव्हा या तरुणीने वेश्यालयात राहायचे आहे असे सांगितले. मोठ्या धिराने ती दलालाच्या जाळ्यातून मुक्त झाली.

Viral News
Viral News : धक्कादायक! 15 वर्षाच्या मुलाच्या पोटातून निघाला चक्क मोबाईल चार्जर अन् हेअरपिन

मॅनेजरला तरुणीने तिची व्यथा सांगत घरी जायचे असल्याची विनंती केली. तेव्हा मॅनेजरच्या मदतीने तरुणीची वैश्यालयातून सुखरुप सुटका झाली. ज्या मॅनेजरच्या मदतीने या तरुणीची सुटका झाली तिचे नाव तारा असे होते. ही तरुणी आजही ताराच्या संपर्कात आहे. ही तरुणी सध्या शिक्षिका बनण्याच्या दिशेने तयारीला लागलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com